022 2580 6417 / 022 2580 1116 / 8879983721 Thane(W), Badlapur(E) & Ulhasnagar 4

सिंधुदुर्ग किनारामध्ये आपले स्वागत आहे.

मी कोंकनातालाच कणकवली तालुक्यातील. हरकुल माझ गांव.गावावरून इकडे स्तायिक होउन बरीच वर्ष झाली.आता अधुनमधुन गाव़ी जात असतो, पण आता ते  पुर्वीच गाव काही अनुभवता येत नाही.
माझ्या बलपणातल गाव माझ अजूनही खुणवत असत.माझ गावाच जुन घर,मी पाहिलेला जत्रेताला दशावतार,माझ्या गावाच गणपति विसर्जन, गावची शेतातली लावणी,होळी,फुगड़या आणि बरंच काही.गावाला लाइट नसताना वापरायचा कंदील, जिच्याावर जेवण केल जायच ती मातीची चुल, ज्या भांड्यात जेवण बनवल जयच ते सोरकूल,हे सगल आठवल की मनातून मी पूर्ण गावचा होवून जातो, माझे बैल, माझी शेती, माझा गणपती हे सर्व काही मला आठवत राहतात राहून राहून….शहरात आल्ल्यानंतर हे काहीच अनुभवता येत नाही याची खंत वाटत राहते.ही खंत दूर करण्यासाठी आणि वरील सर्व गोष्टींचा एकत्र अनुभव घेता यावा यासाठी ठान्यामध्ये मी २००५ साली सिंधुदुर्ग किनारा हे मालवणी रेस्टारेंट चालू केल.वरील सर्व गोष्टींचा एकत्र अनुभव घेण्यासाठी मी माझ्या रेस्तारेंटमध्ये या सर्व गोष्टी एकत्र आणल्या आहेत.
      

आपल्याला गावाच्या जुन्या घरात बसून जेवणाच्या टेबलावर कंदिलाच्या प्रकाश्यात आणि तेसुद्धा सोरकूलातून जेवण जेवणाचा आनंद एकत्र मिळला तर.याच सोबत आपल्याला कोंकताल्या विविध चलिरिती,कोंकनातले विविध सण,कोंकनाताले निसर्ग सौदर्य,कोंकनातिल शेती विशेष म्हणजे जूण कोंकण हे सर्व प्रत्यक्षात टीवी वर पहायला मिळाले तर.
   

मला खात्री आहे हे सर्व अनुभवासाठी आणि आमच रुचकर जेवण जेवान्यासाठी आपण एकदा तरी सिंधूदुर्ग किनारा या रेस्तारेंटला भेट आवश्य दया.